Breaking News

‘एरियन- 5’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून ‘जीसॅट 17’ चे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली, दि. 29 - इस्रोने आज अत्याधुनिक संचार उपग्रह ‘जीसॅट 17’ चे फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण केले. ‘एरियन- 5’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून  ‘जीसॅट 17’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.जीसॅट 17 चे वजन जवळपास 3477 किलोग्रॅम एवढे असून या उपग्रहात दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड,  एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. 
यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आले आहे. शिवाय सर्च आणि रेस्क्यू सेवेसाठी ‘जीसॅट 17’ ची मदत होणार आहे. याव्यतिरिक्त  हवामानाविषयीची माहिती आणि शोधमोहीम तसेच मदतकार्य करण्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी इस्रोने जीएसएलव्ही-मार्क 3 च्या साह्याने  ‘जीसॅट-19’ हे उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर गेल्या आठवड्यात इस्रोने 31 नॅनो उपग्रह अंतराळात पाठवले असून यातील 29 उपग्रह हे 14 देशांचे होते.