Breaking News

तांत्रिक बिघाडानंतर मुंबई मेट्रोची वाहतूक सुरळीत

मुंबई, दि. 29 - तांत्रिक बिघाडानंतर आता मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळी  सकाळी मुंबई मेट्रोच्या सेवेत तांत्रिक बिघाड झाला होता. या बिघाडामुळे अंधेरी ते वर्सोवा ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच घाटकोपर ते अंधेरी मार्गावरील  वाहतूक 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत होत्या.