Breaking News

इराणच्या संसदेवर हल्ला करणारा हल्लेखोर लष्करी कारवाईत ठार

तेहरान, दि. 18 - इराणमध्ये संसद आणि अयातुल्ला खुमैनी यांच्या समाधीस्थळावर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि अन्य दहशतवाद्यांना कंठस्नान  घालण्यात आले. या कारवाई अंतर्गत अनेक संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती इराणच्या सुरक्षा अधिका-यांनी दिली आहे.
इराणमध्ये दहशतवाद्यांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी हल्ला केला होता. यानंतर इराणच्या लष्कराने संशयित दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा शोध घेत ही कारवाई करण्यात  केली. या कारवाईत दोन्ही हल्ल्याचा सूत्रधार ठार झाला आहे. सात जून रोजी चार दहशतवाद्यांनी इराणच्या संसदेवर हल्ला केला होता. यावेळी तेथील लोकप्रतिनिधींना  ओलीस ठेवण्यात आले होते. तर दुसरा हल्ला इसिस च्या एका आत्मघातकी हल्लेखोराने केला होता.