जागतिक हॉकी लीग : भारताचा कॅनडावर 3-0ने विजय
लंडन, दि. 18 - जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या साखळी सामन्यात भारताने कॅनडावर 3-0ने मात केली आणि फेरीतील सलग दुसरा विजय मिळवला. भारताने सुरूवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवले. भारतीय आक्रमणापुढे कॅनडाच्या खेळाडूंना पळता भूई थोडी झाली. भारतातर्फे एस व्ही सुनीलने 6व्या मिनिटाला, आकाशदीप सिंगने 10व्या मिनिटाला आणि सरदार सिंगने 18व्या मिनिटाला गोल करून पूर्वार्धात भारताला 3-0ची आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धातही भारताने आक्रमक खेळ केला, मात्र कॅनडाने सर्व आक्रमणे परतावून लावली. त्यामुळे उत्तरार्धात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.
उद्या भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आ
उद्या भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आ
