Breaking News

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : उपांत्य फेरीत प्रणॉयचा पराभव

जकार्ता, दि. 18 - इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉयला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या झालेल्या  लढतीत जपानच्या काझुमासा सकाई याने त्याला 17-21, 28-26, 21-18 असे पराभूत केले. पहिला गेम प्रणॉयने जिंकला. दुसरा गेम चुरशीचा झाला. प्रणॉयला  पाच मॅच पॉईंट्स मिळूनदेखील त्याला त्याचे विजयात रूपांतर करता आले नाही. अखेर सकाईने दुसरा गेम दोन गुणांच्या फरकाने जिंकला. तिस-या गेममध्येही  दोघांमध्ये चांगलीच झुंज झाली. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी प्रणॉयला फटक्यांचे गुणांमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. याऊलट सकाईने योग्य संधी साधून गुण  मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.