नाल्यात एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह
पिंपरी, दि. 27 - डेक्कन येथील पूना हॉस्पिटलजवळील नाल्यात एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान तरुणाचा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाल्याने त्याची ओळख अद्यापपर्यंत पटू शकलेली नसून मुलाच्या हातावर रिदीप असे नाव कोरलेले आहे. पूना हॉस्पिटल जवळील नाल्यामध्ये नागरिकांना तरुणाचा मृतदेह तरंगत असताना दिसला असता त्यांनी ही बाब डेक्कन पोलिसांना कळविली. त्यानंतर अग्निशामक दलाने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. या तरुणाचा मृतदेह नाल्यातून वाहत आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.