माऊलींचा सोहळा 26 रोजी फलटण मुक्कामी
विडणी, दि. 2 (प्रतिनिधी) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा यंदा दि. 26 जून रोजी फलटण मुक्कामी विसावणार आहे. मुस्लिम धर्मियांची पवित्र रमजान ईद हा याच दिवशी असल्याने हा सुवर्णक्षण प्रथमच ऐतिहासिक फलटण शहरातील जनतेस अनुभवयास मिळणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा यंदा आळंदीहून दि. 17 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 4 जून रोजी आषाढी एकादशी आहे. नीरा नदीतील स्नानानंतर हा वैष्णवांचा मेळा शनिवार, दि. 24 जून रोजी दुपारी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. सोहळा मुक्कामास लोणंद येथे विसावणार आहे. रविवार, दि. 25 रोजी पालखीने तरडगावकडे प्रस्थान केल्यानंतर सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार आहे. सोमवार, दि. 26 जूनला हा पालखी सोहळा ऐतिहासिक फलटण शहरात मुक्कामास येणार असून याच दिवशी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सांस्कृतिक वारसा संस्थान काळापासून जोपासत आलेल्या शहरवासीयांसाठी हा दुग्धशर्करा योग ठरणार आहे.
मंगळवार, दि. 27 जूनच्या मुक्कामानंतर हा सोहळा 28 जूनला बरडहून प्रस्थान करेल व दुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली फलटण येथे इंदिरा गाधी सांस्कृतिक भवनात प्रशासकीय अधिकार्यांची नियोजन बैठक होणार आहे. यावेळी फलटण मुक्कामी माऊलींचे पालखी आगमन व मुस्लिमांचा पवित्र रमजान सण एकाच दिवशी आल्याने याबाबत बैठकीत चर्चा होईल.