संततधार पावसात ठामपाची यंत्रणा 24 तास कार्यरत
ठाणे,दि.26 : ठाणे शहरात काल रात्रीपासून पडत असलेल्या संतंतधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन पथकासह सर्व अधिकारी आणि यंत्रणा कार्यरत होती. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान कळवा रेल्वे स्टेशन येथे ट्रॅकवर पाणी साचलेल्या ठिकाणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी रेल्वेच्या अधिकार्यांसह पाहणी करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत निर्णय झाला.कालरात्रीपासून सर्वत्र संतंतधार पर्जन्यवृष्टी होत असून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यरत होती. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेची तक्रार येत होती त्या सर्व ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणेद्वारे कार्यवाही करण्यात येत होती. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी कळवा स्टेशन येथे पाणी साचलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त संजय हेरवाडे, रेल्वेचे सहाय्यक विभागीय रविंद्र कुमार गोयल, वरिष्ठ विभागीय अभियंता रिझवान अहमद आणि महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी रेल्वेचे कल्व्हर्ट आहे. या ठिकाणी महापालिकेने मोठा रस्ता बांधला असून रेल्वेच्या अरूंद कल्व्हर्टमुळे तिथे पाणी साचले होते. याबाबत सदरचा रेल्वे कल्व्हर्ट महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याविषयी चर्चा झाली.