Breaking News

इफ्तार पार्टीची 20 वर्षांची परंपरा ट्रम्प यांनी काढली मोडीत


वॉशिंग्टन,दि.26 : व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केली जाणार इफ्तार डिनर पार्टी यंदा रद्द करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेली प्रथा या वर्षी बंद करण्यात आली. असे असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पहिल्या महिला मेलानिया ट्रम्प यांनी मुस्लीमांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 1996 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन यांच्या कार्यकाळात मुस्लीमांसोबत सौहार्दासाठी इफ्तार पार्टीची सुरुवात हिलेरी क्लिटंन यांनी केली होती. ही परंपरा पुढे माजी राष्ट्राध्यक्ष जार्ज बुश व बराक ओबामा यांनीही सुरू ठेवली. या पार्टीत मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत मुस्लीम देशांचे राजकीय अधिकारी व सिनेटर सामील होतात. या वर्षी ट्रम्प यांनी केवळ शुभेच्छा देऊन इतक्या वर्षांची परंपरा मोडीत काढली.