Breaking News

1 जुलैपासून रेल्वेच्या वातानुकूलित, प्रथम श्रेणीच्या भाडे दरात वाढ

नवी दिल्ली, दि. 23 - देशभरात 1 जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर रेल्वेच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या भाडे दरात वाढ होणार आहे. नवी  करप्रणाली लागू झाल्यानंतर तिकीटावरील सेवा करात 4.5 टक्क्यांची वाढ होऊन 5.0 टक्के होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सेवा कर केवळ वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या प्रवासावरच कर लावण्यात येणार आहे . तिकीटाची रक्कम सध्या 2हजार  रुपये असेल तर पुढील महिन्यात ही रक्कम 2010 रुपये असेल.