जुहू किनार्यावर एकाचा बुडून मृत्यू
मुंबई,दि.26 : जुहू समुद्रकिनार्यावर दोन मुले बुडल्याची घटना घडली. त्यातील एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत दुसर्याचा शोध घेणे सुरू होता. कोळीवाडा येथे समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी ही दोघे जण गेली असता ते बुडाले. त्यातील अभिषेक मडव (वय 22) याचे प्रेत सापडले असून अंकुर बेटकर (वय 17) याचा शोध सुरू आहे.