कुंबळेंचा अर्ज दाखल; 18 जूनपर्यंत प्रशिक्षकाच्या नियुक्तीची शक्यता
नवी दिल्ली, दि. 08 - भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी या पदासाठी होणा-या आगामी मुलाखतींसाठी अर्ज दाखल केला आहे. कुंबळे यांचा हंगामी कार्यकाळ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपर्यंतचा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रितसर प्रक्रियेनुसार नवा प्रशिक्षक निवडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार कुंबळे यांनी अर्ज दाखल केला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संपेपर्यंत म्हणजेच 18 जूनपर्यंत नव्या प्रशिक्षकाची निवड होण्याची शक्यता आहे.
या पदासाठी कुंबळे यांनी अर्ज दाखल करण्याची गरज नव्हती. कारण सध्या या पदावर कार्यरत असल्याने मुलाखतींसाठीच्या अंतिम यादीत त्यांना आपोआपच समाविष्ट करण्यात आले होते, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या पदासाठी मंडळाच्या सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे मुलाखती घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सल्लागार समितीची या आठवड्यात बैठकही होणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संपल्यावर लगेचच भारताला विंडिज दौ-यावर जायचे आहे. त्यामुळे चॅम्पियन्स स्पर्धा संपेपर्यंत म्हणजेच 18 जूनपर्यंत नवा प्रशिक्षक निवडण्याची मंडळाची योजना आहे.
वीरेंद्र सेहवाग , टॉम मुडी , रिचर्ड पायबस , लालचंद राजपूत , दोड्डा गणेश यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.