आयपीएल : पुणे संघाचे मालक राजस्थानच्या मालकीसाठी उत्सुक?
लंडन, दि. 08 - ‘आयपीएल’मधील पुणे संघाचे मालक उद्योगपती संजीव गोयंका हे आता राजस्थान रॉयल्स संघाच्या मालकीसाठी उत्सुक असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पुणे आणि गुजरात संघाचे हे आयपीएल स्पर्धेतील अखेरचे वर्ष होते. पुढील हंगामापासून राजस्थान आणि चेन्नई हे संघ स्पर्धेत पुनरागमन करणार आहेत. सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे काही अधिकारी लंडनमध्ये आहेत. त्यामुळे ‘राजस्थान’च्या मालकीसाठी उत्सुक गोयंका यांचे लंडनमध्ये ‘लॉबिंग’ सुरू असल्याचे बोलले जात आहे.
गोयंका यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. ‘मी व्यवसायाच्या निमित्ताने लंडनमध्ये आलो आहे. माझ्या कंपनीत येथे 4000 लोक काम करतात. त्यांच्याकडे लक्ष देणे हे माझे कर्तव्य आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच, मी येथे आलो आहे, तर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांनाही हजेरी लावेन, असेही गोयंका यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, क्रिकेट संबंधी प्रश्न न विचारताही गोयंका यांनी सामना पाहण्यास जाणार असल्याचे स्पष्टीकरण गोयंका यांनी दिले आहे.