भाजप आमदाराच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आमहत्या
गडचिरोली, दि. 23 - गडचिरोलीचे भाजपचे आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकानं आमदार कार्यालयासमोरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भास्कर चौके असं या अंगरक्षकाचं नाव असून त्यानं आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, भास्कर चौके यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.