Breaking News

पी.ए. इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल

अहमदनगर, दि. 02 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा पी.ए. इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून, विद्यार्थ्यांना उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर, खजिनदार डॉ.खालिद शेख, प्राचार्या रोशिनी डिसोजा, उपाध्यक्ष इंजी. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी, मार्गदर्शक शिक्षिका शबनम शेख, समरीन शेख, सचिन जाधव, मोहसीन शेख आदिंसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्या रोशिनी डिसोजा म्हणाल्या की, दृढ इच्छा असेल तर मार्ग सापडतो. हे विद्यार्थ्यांनी मेहनत घेवून, इच्छाशक्तीने सिध्द केले आहे. शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या कष्टाचे खर्या अर्थानी चीज झाल्याचे सांगून, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. अब्दुल रहीम खोकर यांनी संस्थेने शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी इतर राज्यातील शिक्षकांची नेमणुक केल्याने विद्यार्थ्यांना हे यशोशिखर गाठता आल्याचे सांगितले. उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे पी.ए. इनामदार शाळा परिवार व संस्था पदाधिकार्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शबनम शेख यांनी केले. आभार समरीन शेख यांनी मानले.