पंजाबमधील माजी पोलीस महासंचालक गिल यांचे निधन
नवी दिल्ली, दि. 27 - पंजाबमधील दहशतवाद नष्ट करण्यात मुख्य भूमिका बजावलेले माजी पोलीस महासंचालक के.पी.एस. गिल यांचे आज निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गिल हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, असे डॉक्टरांनी सांगितले होते. गिल हे भारतीय हॉकी संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. गिल हे सुपर कॉप या नावाने प्रसिद्ध होते.
पंजाबचे शेर म्हणून प्रसिद्ध असलेले गिल यांना प्रशासकीय सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगीरीबाबत 1989मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1958 मध्ये हिंदुस्थानी पोलीस दलाचा सेवाभार स्वीकारला होता. 1988 ते 1990 मध्ये गिल यांची पहिल्यांदा पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून निवड झाली होती. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे 1991 मध्ये त्यांना दुसर्यांदा जबाबदारी देण्यात आली. ते 1995 मध्ये हिंदुस्थानी पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. गिल यांच्या काळात पंजाबमध्ये खलिस्तानी समर्थक सक्रिय होते. पंजाबमधील खलिस्तानी आंदोलन नष्ट करण्यात गिल यांचा महत्त्वाचे योगदान होते. 2000 ते 2004 मध्ये श्रीलंकेच्या ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ ईलम’ (एलटीटीई) विरोधात रणनीती तयार करण्यामध्येही गिल यांनी मदत केली होती. तसेच 2006मध्ये छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गिल यांची सुरक्षा सल्लागार या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.