Breaking News

मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली- राष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. 27 - नागरिकांशी उत्तम संवाद साधणा-या व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी यांचाही समावेश आहे. त्यांची तुलना आपण पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांसारख्या पंतप्रधानांबरोबर करू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे. सरकारला तीन वर्ष झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा दिली आहे. पंतप्रधान मोदी हे आपले मत दुस-यांना उत्तमपणे समजावून सांगतात. उत्तम संवाद करता आल्याशिवाय लाखो लोकांचे नेतृत्व कठीण असते. पंतप्रदान मोदी यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे भारत विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे त्यांनी नमूद केले.