प्रा. सुखदेव थोरात यांना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली, दि. 27 - प्राध्यापक सुखदेव थोरात यांना आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वर्ष 2011 चा डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. केलेल्या कामाचे उचित मूल्याकंन झाले असून पुरस्काराने समाधानी असल्याची भावना प्रा. थोरात यांनी व्यक्त केली. विज्ञान भवन येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत येणा-या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्या वतीने दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या मान्यवरांना राष्ट्रपतीच्या हस्ते डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात आले. या सोहळयात वर्ष 2011, वर्ष 2012 तसेच वर्ष 2014 साठी देशभरातील तीन संस्था आणि एका व्यक्तीला यावेळी सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रूपये रोख प्रशस्तिपत्र असे आहे.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री विजय सांपला, रामदास आठवले, कृष्णपाल, डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दारा संभय्या, सचिव जी. लथा कृष्णराव मंचावर उपस्थित होत्या. प्रा. सुखदेव थोरात हे मूळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे आहेत. त्यांनी अर्थशास्त्र विषयात दिल्लीतील जवाहर लाल नेहरू विद्यापीठातून पीएच.डी. केली. 1989 ते 1991 पर्यंत आईओवा स्टेट विद्यापीठ, युएस येथे प्रा. थोरात अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. यासह इंटरनॅशनल फुड पॉलिसी रिसर्च इंस्टिट्युट, वाशिंगटनमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत होते. 2006 ते 2011 दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
प्रा. थोरात यांना 2008 मध्ये भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले. सध्या ते भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषद (आईसीएसएसआर) चे अध्यक्ष आहेत. यासह जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणुनही कार्यरत आहेत. प्रा. थोरात हे जाती प्रथा, जातीय भेदभाव, अर्थव्यवस्था आणि गरिबी या विषयाचे विश्लेषक आहेत. यासह डॉ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचे ते गाडे अभ्यासक आहेत. प्रा. थोरात यांनी आतापर्यंत 21 पेक्षा अधिक शैक्षणिक पुस्तके लिहिलेली आहेत. यासह त्यांचे 100 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत.