Breaking News

गोरक्षेचे समर्थन करतो मात्र कायद्याचे उल्लंघन करणा-यांशी आमचा संबंध नाही - नितीन गडकरी

नवी दिल्ली, दि. 22 - आम्ही गोरक्षेचे समर्थन करतो मात्र कायद्याचे उल्लंघन करणा-यांशी आमचा संबंध नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  केले. एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. गोरक्षेच्या नावावर होणा-या मारहाणींच्या घटनांवर प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, कोणीही भगवे वस्त्र परिधान  करुन कसेही वर्तन करतील तर आमची अब्रु जाईल?, असा सवाल त्यांनी विचारला.
ते म्हणाले की, संयुक्त पुरोगामी आघाडीने मागील 10 वर्षात जे केले नाही ते आम्ही मागील 3 वर्षात केले. आमच्याकडून देशातील जनतेला आणखी अपेक्षा आहेत.  आमचे सरकार सर्व कामे पारदर्शकतेने पार पाडते. पुढील काळात आम्ही आणखी उत्तमरित्या कार्य करु, असेही त्यांनी नमूद केले.