काश्मीरप्रश्नावर सरकार लवकरच तोडगा काढेल - राजनाथ सिंग
नवी दिल्ली, दि. 22 - काश्मीर आमचे आहे. त्यामुळे आम्ही लवकरच याप्रश्नावर कायमचा तोडगा काढू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. सिक्कीममधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारताकडून वेळोवेळी मैत्रीचा हात पुढे केला जात आहे. तरीही पाकिस्तानचे सीमा रेषेवरील कारस्थान थांबत नाही. भारताचे मैत्रीसाठीचे प्रयत्न पाक काही केल्या समजून घेत नाही. आजही काश्मीरमध्ये समस्या निर्माण करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सिंग यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मी पाकला सांगू इच्छितो की, काश्मीर हे आमचेच आहे. काश्मीरमधील जनताही आमचीच आहे आणि काश्मिरीयतही आमचीच आहे. आम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना 2014 च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास आमंत्रित केले होते. केवळ हात मिळवण्यासाठी नव्हे, तर आपल्या अंत: करणात त्यांना सामील करुन घेण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र इतके करुनही पाकिस्तानचा भारताविषयीचा दृष्टीकोन बदलला नाही. आम्ही आशा करतो की ते सुधारतील आणि नाही सुधारले तर त्यांना सुधारावेच लागेल, असे त्यांनी नमूद केले.