ऑरेन्ज, पर्पल कॅपचा मान हैदराबादला!
हैदराबाद, दि. 22 - आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्सने विजेतेपद आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सने उपविजेतेपदावर नाव कोरलं. पण ऑरेन्ज कॅप आणि पर्पल कॅपचा मान मात्र हैदराबादच्या शिलेदारांनी मिळवला.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या मोसमात 14 सामन्यांत 58.27 च्या सरासरीने 641 धावांचा रतीब घातला आणि सर्वोत्तम फलंदाजासाठीची ऑरेन्ज कॅप मिळवली. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.
ऑरेन्ज कॅपचा मान वॉर्नरला मिळण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 2015 सालीही वॉर्नरच सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. याआधी केवळ ख्रिस गेलच (2011 आणि 2012) ऑरेन्ज कॅपचा मानकरी ठरला होता. हैदराबादचाच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यंदाच्या मोसमात सर्वाधिक 26 विकेट्स काढल्या. त्यामुळे सलग दुसर्या वर्षी भुवनेश्वरलाच पर्पल कॅपचा मान मिळाला. यासाठी त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीसही मिळालं.