मृतदेहांच्या विटंबनेत पाक लष्कराचा सक्रीय सहभाग - अरुण जेटली
नवी दिल्ली, दि. 04 - भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेमागे पाकिस्तानी लष्कराचा सक्रीय सहभाग असल्याचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र हा दावा जेटली यांनी फेटाळून लावला.
भारताकडे असलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मृतदेहाच्या विटंबनेमागे पाकिस्तानी लष्कराचा सक्रीय सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतीय हद्दीत घुसणार्या लष्कराला मागून संरक्षण दिले जात होते. दोन्ही सैन्यांमध्ये काही अंतरावर चकमक सुरू होती. मृतदेहाची विटंबना करून पळ काढणे याशिवाय शक्य नव्हते, असे जेटली यांनी सांगितले. पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबन करण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अधिकारी अब्दुल बासित यांना समन्स बजावल्यानंतर जेटली यांनी हे वक्तव्य केले.