Breaking News

अहमदाबाद - चेन्नई हमसफर एक्सप्रेसला रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

उदवाडा, दि. 04 - अहमदाबाद ते चेन्नई दरम्यानच्या हमसफर एक्सप्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा कंदील दाखवला. हा गाडी वसई रोड मार्गे जाणार आहे. ही गाडी नियमितपणे 8 मेपासून सुरू होणार आहे. 
गाडी क्रमांक 22920 अहमदाबाद - चेन्नई हमसफर एक्सप्रेस दर सोमवारी दुपारी 3 वाजून 30 मिनिटानी अहमदाबादहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 10 वाजून 35 मिनिटानी चेन्नईला पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 22919 चेन्नई - अहमदाबाद हमसफर एक्सप्रेस दर बुधवारी रात्री 8 वाजून 05 मिनिटांनी चेन्नई सुटेल आणि तिसर्‍या दिवशी मध्यरात्री 3 वाजून 15 मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल.
गाडीचे थांबे - वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, पुणे, सोलापूर, गुलबर्ग, रायचूर, गुंटकल आणि रेनिगुंटा.
गाडीची संरचना - तृतीय श्रेणी वातानुकुलित शयनयान.