आ.अमानतुल्लाह खान यांचे निलंबन, विश्वास राजस्थानचे प्रभारी
नवी दिल्ली, दि. 04 - आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले असून नेते कुमार विश्वास यांच्याकडे राजस्थानचे प्रभारी पद सोपवण्यात आले आहे.या घडामोडींमुळे कुमार विश्वास हे आप मध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . तसेच आप मधील फूट टळल्याचेही मानले जात आहे.
कुमार विश्वास यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन पक्ष व पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याबाबतची नाराजी व्यक्त केली होती. मला पक्षात कोणतेही पद नको, मुख्यमंत्रीपदही नको. मात्र पक्षातील चुकांकडे मी कानाडोळा करू शकणार नाही, चुका दाखवत राहणार, असे ते काल म्हणाले होते. चित्रफितीबाबत माफी मागणार नाही. बाहेरच्या पक्षातून आलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जाईल असे वाटले नव्हते. असे आरोप त्यांनी केजरीवाल किंवा सिसोदिया यांच्यावर केले असते तर आत्तापर्यंत त्यांना पक्षातून बाहेर काढले असते असेही ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर विश्वास यांची मनधरणी करण्यासाठी अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी काल रात्री उशीरा विश्वास यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर आमदार खान यांना निलंबित करण्याचा नॉर्न्य घेण्यात आला.