जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा स्कायमेट चा अंदाज
नवी दिल्ली, दि. 27 - यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून देशात नियोजित वेळेच्या आधी पोहोचलेला आणि त्यानंतर जलद गतीने पश्चिम किनारपट्टीकडे मार्गक्रमणा करण्याची अपेक्षा आहे. जून महिन्यात सामान्यापेक्षा अधिक मान्सून होण्याचा अंदाज स्कायमेट या हवामान विषयक संस्थेने व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
जून महिन्यात सामान्यत: 164 मिलीमीटर मान्सून होतो. जुलै व ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे 189 व 269 मिलीमीटर मान्सून होतो. 29 व 30 मे नंतर दक्षिण-पश्चिम मान्सून पश्चिम किनारपट्टीसह पूर्व व उत्तर-पूर्व भागांतही सक्रीय होण्याचा अंदाज स्कायमेट संस्थेचे मुख्य हवामान शास्त्रज्ञ महेश पलावत यांनी व्यक्त केला आहे. जून महिन्यात छत्तीसगढ व विदर्भात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे, असेही पलावत यांनी सांगितले. यावर भारतीय हवामान विभागाचे संचालक डी.एस. पै यांनीही सहमती दर्शवली आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होऊन देशभरात पसरण्यास मान्सूनला अधिक गती मिळेल, असेही पै यांनी सांगितले.