कर्नाटकमध्ये येडियुरप्पा भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, अमित शहा यांची घोषणा
नवी दिल्ली, दि. 27 - कर्नाटकमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा असतील, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. कर्नाटकमध्ये भाजप पहिल्यांदा सत्तेवर त्यावेळी येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री होते. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे येडियुरप्पा यांना पायउतार व्हावे लागले.
गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानीच गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे संकेतही अमित शहा यांनी दिले. भाजपला 182 सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत 150 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला. हिमाचल प्रदेशमध्येही पुढील वर्षी निवडणुका होणार असून तेथील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत शहा यांनी काही उत्तर दिले नाही.