Breaking News

नौशेरामधील पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त, लष्कराचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर, दि. 24 - नौशेरा भागामधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी लष्कराकडून  घुसखोरांना मदत केली जात असल्याची शक्यता लष्कराकडून वर्तवण्यात आली आहे. 
लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती मेजर अशोक नरुला यांनी दिली. बर्फ विरघळल्याने घुसखोरचे प्रमाण वाढल्याची शक्यता नरुला यांनी यावेळी व्यक्त केली.  पाकिस्तानने सीमेवरील घुसखोरी थांबवावी. आम्ही अलीकडेच नौशेरामध्ये केलेली कारवाई घुसखोरीविरोधात असून हा आमच्या दहशतवादविरोधी अभियानाचा भाग  आहे. काश्मीरमध्ये आम्हाला शांततेचे वातावरण हवे आहे. यासाठी सीमेवरील घुसखोरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे दहशतवाद्यांची संख्या कमी  होईल आणि राज्यातील तरुणाई चुकीच्या मार्गाला जाणार नाही. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सीमेवर अशाप्रकारची कारवाई करतच असतो, असेही त्यांनी सांगितले.  दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सीमा रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. तसेच पाकिस्तानमधून घुसखोरीचे प्रमाणही वाढले होते.  या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.