Breaking News

‘फेसबुक’द्वारे आता अन्नपदार्थही मागवता येणार

नवी दिल्ली, दि. 24 - ‘फेसबुक’ नेहमीच नवनवीन फीचर्स सादर करत असते. आता ‘फेसबुक’मुळे घरबसल्या अन्नपदार्थही मागवता येणार आहेत. लवकरच  ग्राहकांना अन्नपदार्थ पोहोचवण्याची सेवा ‘फेसबुक’कडून सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा प आणि वेब या दोन्ही माध्यमातून पुरवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत  ही सुविधा अमेरिकेतील काही निवडक ग्राहकांसाठीच सुरु करण्यात आली आहे. मात्र पुढील काही कालावधीत ही सुविधा भारतातही सुरू करण्यात येणार असल्याचे  फेसबुककडून सांगण्यात येत आहे.
‘फेसबुक’ डेस्कटॉपमध्ये फूड ऑर्डर हे फीचर एक्सप्लोर सेक्शनमध्ये असणार आहे. अ‍ॅपमध्ये हॅमबर्गर आयकॉनवर क्लिक केल्यानंतर फूड ऑर्डर या फीचरचा वापर  करता येणार आहे. येथे क्लिक केल्यानंतर जवळच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधून अन्नपदार्थ मागवता येणार आहेत. त्यामुळे फूड ऑर्डर करण्यासाठी आता तुम्हाला  दुस-या कोणत्या अ‍ॅपचा वापर करण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे. ‘फेसबुक’चे चाहते जास्त असल्यामुळे फूड पांडा , झोमॅटो, स्विगी यासारख्या अ‍ॅपच्या  तुलनेत फेसबुकची ही सुविधा लवकर लोकप्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.