Breaking News

तर त्यासाठी भाजप सरकार जबाबदार असेल - मायावती

लखनौ, दि. 24 - उत्तर प्रदेशमधील सहारनपूर शहराचा दौरा करण्यासाठी हेलिकॉप्टर सुविधेसाठी परवानगी मिळाली नाही. या दौ-या दरम्यान मला काहीही  झाले तर त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारची असेल, असे बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या. 
हेलिकॉप्टरने सहारनपूरचा दौरा करण्याची मायावती यांची मागणी अधिका-यांनी अमान्य केली. हेलिकॉप्टर सुविधेसाठी माझ्या पक्षातील काही जणांनी पोलीस  अधीक्षकांसाठी भेट घेतली होती. मात्र, अधिका-यांनी ती मागणी अमान्य केली. त्यामुळे मला रस्त्याने सहारनपूरला जावे लागत आहे. या दौ-या दरम्यान मला काही  झाले तर, यासाठी भाजप सरकार जबाबदार असेल, असेही मायावती म्हणाल्या.