Breaking News

उ.प्र. सामुहिक बलात्कार प्रकरणातील कुटुंबामागील शुक्लकाष्ट संपेना

जेवार, दि. 27 - उत्तर प्रदेशातील जेवार-बुलंदशहर महामार्गावर गुरूवारी एका घटनेत एकाच कुटुंबातील एका पुरूषाची हत्या करण्यात आली तर चार महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता या कुटुंबामागील शुक्लकाष्ट संपायचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे.
गेल्या पाच वर्षात या 4 भावांच्या एकत्र कुटुंबातील चौघांचा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. 2013मध्ये जेवार प्रकरणातील मृताच्या मोठ्या भावाचा दुचाकीवरून रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला होता. या धक्क्यातून कुटुंबीय पूर्णपणे सावरले नसतानाच मार्च 2014 मध्ये दुस-या भावाचा दुकानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मोठ्या भावाच्या अपघातामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. ते 48 वर्षाचे होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांचा मुलगा रस्ते अपघातात मारला गेला. तर, काल झालेल्या दुर्देवी घटनेत एकाला गोळी झाडून मारण्यात आले. काल मृत्यू झालेल्या इसमाला एकूण सात आपत्य असून त्यातील चार मुले आहेत. ही सातही आपत्य 3 ते 15 या वयोगटातील आहेत.