कालका मेल अपघातप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईवर न्यायालय समाधानी
अलाहाबाद, दि. 27 - 2011 मध्ये हावडा कालका मेल गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी रेल्वेने केलेल्या कारवाईबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला.
कालका मेलला झालेल्या अपघातात 80 जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 200 जण जखमी झाले होते. या अपघाताचा तपास लखनौ विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केला होता. या अपघाताला कारणीभूत असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून असे अपघात रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, असे रेल्वेच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. वकील भारती कश्यप यांनी या अपघातास कारणीभूत असलेल्यांविरोधात योग्य कारवाई होण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.