Breaking News

‘पीएसएल’च्या पुढच्या हंगामात आठ सामने पाकिस्तानात : सेठी

इस्लामाबाद, दि. 27 - पाकिस्तान क्रिकेट मंडळातर्फे खेळवण्यात येणा-या पाकिस्तान सुपर लीग या देशांतर्गत टी20 स्पर्धेच्या पुढील हंगामात आठ सामने पाकिस्तानात खेळवण्यात येतील, असा विश्‍वास ‘पीएसएल’चे अध्यक्ष नजाम सेठी व्यक्त केला. गेल्या हंगामात पीएसएलचा केवळ अंतिम सामनाचा पाकिस्तानात खेळवण्यात आला होता. इतर सर्व सामने सुरक्षेच्या कारणास्तव दुबईत खेळण्यात आले होते.
‘मागील हंगामात या स्पर्धेचा केवळ एकच सामना पाकिस्तानात खेळण्यात आला होता. पण तो सामना सुरक्षित पार पडला. त्यामुळे यंदाच्या हंगामात आठ सामने पाकिस्तानात खेळण्यात येणार आहेत. कराची आणि लाहोर येथे प्रत्येकी चार सामने खेळण्यात येतील. हे सामने ‘डबल हेडर’ म्हणजेच एका दिवशी दोन सामने अशा पद्धतीने खेळण्यात येतील’, अशी माहिती सेठी यांनी दिली.