राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही - अमित शहा
नवी दिल्ली, दि. 22 - राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना उमेदवारी देणार नसल्याचे शहा म्हणाले.
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर लवकरच केंद्र सरकार नियंत्रण मिळवेल, असा दावा करत ते म्हणाले की, काश्मीरमधील वास्तविक स्थिती आणि दाखवल्या जात असणार्या स्थितीत बरेच अंतर आहे. काश्मीरमधील समस्या साडे तीन जिल्ह्यांपर्यंत मर्यादित आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर केंद्र सरकारची बारकाईने लक्ष ठेवून नजर असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यापासून काँग्रेस सरकारने अवंलबलेल्या धोरणामुळेच काश्मीर प्रश्न चिघळला असून काँग्रेसला काश्मीरवरुन भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही, अशी टीका त्यांनी केली. सुपरस्टार रजनीकांत यांच्या भाजपप्रवेशाबाबत प्रश्न विचारल्यास हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पक्षात चांगल्या लोकांचे स्वागत आहे, असे त्यांनी सांगितले.