Breaking News

कार्बन उपकर हटवल्याने उत्तराखंडमधील पेट्रोल, डिझेलच्या दरात घट

डेहराडून, दि. 24 - कार्बनवरील उपकर हटवण्याच्या उत्तराखंड सरकारच्या निर्णयामुळे येथील पेट्रोल व डिझेलच्या दरात घट झाली. अधिका-यांनी दिलेल्या  माहितीनुसार पेट्रोलची किंमत 25 पैसे प्रति लीटर इतकी घट झाली असून डिझेलची किंमत 50 पैसे प्रति लीटर इतकी घट झाली आहे. हा नवीन दर सोमवार  रात्रीपासून लागू करण्यात आला. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग यांच्या मंत्रिमंडळाने 11 मे रोजी कार्बन उपकर हटवण्याचा निर्णय घेतला. उत्तरखंडमधील वाहनांमध्ये उत्तर  प्रदेशमधून इंधर भरले जात असल्याने राज्याचे मोठे नुकसान होत होते. त्यानंतर उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी सांगितले होते की, कार्बन उपकरामुळे एकीकडे  दरवर्षी 24 कोटींचा महसून राज्याच्या तिजोरीत जमा होत असला तरी पेट्रोल व डिझेलच्या दरावर त्याचा परिणाम होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कार्बनवरील उपकर  हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तराखंड सरकारच्या या निर्णयामुळे उत्तराखंड व उत्तर प्रदेशमधील पेट्रोल व डिझेलचे दर समान झाले आहेत.