Breaking News

भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत

भिवंडी, दि. 26 - भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसनं पुन्हा एकदा काबिज केली आहे. 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे भाजपनं भिवंडी महापालिका खेचण्यासाठी बराच जोर लावला होता. भाजप खासदार कपिल पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. पण भाजपला अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इथं शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. तर  समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला.  याशिवाय कोणार्क विकास आघाडी 4 आणि आरपीआयला 4 जागा मिळाल्या.
भिवंडी महापालिका निकाल - एकूण जागा 90 काँग्रेस- 47 विजयी, भाजप- 19 विजयी, शिवसेना 12 विजयी, कोणार्क-4 विजयी, समाजवादी-2 विजयी, आरपीआय-4 विजयी राष्ट्रवादी-0, अपक्ष 2.