Breaking News

मालेगाव महापालिकेत काँग्रेस 28 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 26

मालेगाव, दि. 26 - मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. 84 जागांच्या महापालिकेत काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीचा क्रमांक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 26 जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेनेनेच्या उमेदवारांनी 13 जागांवर विजय मिळवला आहे. मागील महापालिका निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या दोन जागा वाढल्या आहेत. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र मालेगावात भाजपला ऐतिहासिक यश मिळालं आहे. एकही जागा नसलेल्या भाजपला नऊ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा गेल्या आहेत. 21 प्रभागातून 84 उमेदवार महापालिकेवर निवडून जाणार आहेत. गेल्या वर्षी काँग्रेस आणि तिसरा महाज एकत्रित यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. यावेळी राष्ट्रवादी आणि जनता दलाची युती झाली असून तिसरा महाज राष्ट्रवादीसोबत लढत आहेत. तर काँग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, काहीही झालं तरी राष्ट्रवादी-जनता दल युती काँग्रेससोबत युती करणार नाही, असं जनता दलाचे नेते बुलंद इकबाल निहाल अहमद यांनी सांगितलं. तसंच मनपात जनता दल-राष्ट्रवादी युतीच सर्वात मोठा पक्ष असेल. महापौरही आमचाच होणार, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. जनता दलाच्या या पवित्र्यामुळे शिवसेना, एमआयएम, भाजपचा भाव वधारणार आहे. इथे तिन्ही पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहे.