Breaking News

इराणकडून पाकिस्तानमधील बलुचिस्तानात हल्ले

क्वेट्टा, दि. 22 - इराणच्या सीमेवरुन पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथील चाघाई भागात उखळी तोफांचा मारा करण्यात आला आहे. मात्र, त्यात जीवित हानी  झाल्याचे वृत्त नाही. मागील महिन्यात इराणच्या सीमा सुरक्षादलातील 10 जणांना ठार करण्यात आले होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत सुन्नी दहशतवादी,  जैश-अल-अदल किंवा पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला होता.
पाकिस्तान आणि इराणदरम्यान सातत्याने असे हल्ले होत आहेत. या दोन देशांत असणार्‍या सीमेवरील मार्गाचा व्यापारी मार्ग म्हणून अनेक वर्षांपासून वापर केला जातो.  परदेशी नागरिकही याच मार्गाचा वापर करत असून येथील सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.