Breaking News

तीन वर्षांच्या कालावधीत चीनमध्ये ‘सीआयए’च्या 12 हेरांची हत्या

वॉशिंग्टन, दि. 22 - चीनमध्ये2010 ते 2012 या कालावधीत अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या 12 हेरांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती  उघड झाली आहे. ही माहिती सीआयएमधील 10 आजी-माजी अधिकार्‍यांनी दिली आहे. चीनमध्ये अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे सर्वात मोठे जाळे आहे.
सीआयएमधीलच एखादा व्यक्ती गुप्त माहिती बाहेर देत असून त्यामुळेच चीनच्या गुप्तचर यंत्रणेने या हेरांबाबत गोपनीय माहिती मिळवुन त्यांची हत्या केली असावी असा  अंदाज व्यक्त केला जात आहे. तीन वर्षाच्या कालावधीत चीनमध्ये ’सीआयए’च्या 20 एजंट्सची हत्या केली गेली किंवा त्यांना तुरुंगात पाठवले. यातील एका एजंटची  त्याच्या सहकार्‍यासमोरच हत्या करण्यात आली होती.