रजनीकांतबाबत भाजप खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामींचे वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली, दि. 22 - रजनीकांत मूर्ख आणि अडाणी माणूस असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. स्वामी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व संवाद केंद्राच्या नारद जयंती कार्यक्रमात स्वामी यांनी रजनीकांत यांना लक्ष्य करून त्याच्यावर जोरदार टीका केली.
भारत आणि पाकिस्तानची राज्यघटना रजनीकांत यांच्या समोर ठेवली तर, कुठली राज्यघटना कुठल्या देशाची आहे हे त्यांना समजणार नाही. रजनीकांत यांना राजकारणात आणण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असल्याचेही स्वामी म्हणाले.
यावेळी स्वामी यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी केली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव बदलून सुभाष चंद्र बोस विद्यापीठ करा, अशी मागणीही स्वामी यांनी केली.