Breaking News

इंग्लंडमध्ये असुरक्षित वाटत नाही : कोहली

लंडन, दि. 27 - मॅन्चेस्टर येथे झालेल्या हल्ल्यानंतरही इंग्लंडमध्ये खेळताना किंवा फिरताना अजिबात असुरक्षित वाटत नाही, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर कोहलीने हॉटेलमध्येर एक फेरफटका मारला आणि खेळाडू सुरक्षित असल्याची खात्री दिली.
‘इंग्लंडमध्ये फिरताना अजिबातच असुरक्षितता वाटत नाही. मला एकटे फिरायला खूप आवडते. कोणीही आजूबाजूला नसेल, तर फेरफटका मारायला अधिक प्रसन्न वाटते. मला परदेशी दौरे आवडतात. कारण मायदेशात चाहत्यांचे कायम लक्ष आपल्यावरच असते. परदेशात मात्र तसे काही नसते’, असे कोहली म्हणाला. मॅन्चेस्टर येथे झालेला दहशतवादी हल्ला हा अतिशय दु:खद आणि मन हेलावून टाकणारा होता, अशा शब्दात कोहली त्या हल्ल्याची निंदा केली.