Breaking News

नजाम सेठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष

लाहोर, दि. 27 - पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष नजाम सेठी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मंडळाच्या काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शहरयार खान यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सेठी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. अध्यक्षपदच्या निवडणुकीसाठी पुन्हा सहभागी होणार नसल्याचे शहरयार खान यांनी आधीच सांगितले होते, त्यामुळे सेठी यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.