Breaking News

सुदीरमन कप : सिंधूने भारताची लाज राखली

गोल्ड कोस्ट, दि. 24 - सुधीरमन कप स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेत डन्मार्कने भारताचा 4-1 असा दारूण पराभव केला. मात्र, ऑलिम्पिक  पदकविजेत्या पी.व्ही.सिंधूने लाईन कजाएरसफेल्डट हिला महिला एकेरीमध्ये पराभूत केले आणि भारताला ‘व्हाईटवॉश’च्या नामुष्कीपासून वाचवले. सिंधूने लाईनला  21-18, 21-6 असे नमवले. पहिल्या सेटमध्ये लाईनने सिंधूला चांगली टक्कर दिली. मात्र सिंधूने तो सेट 21-18 असा जिंकला. दुस-या सेटमध्ये लाईनकडून  संघर्ष पाहायला मिळाला नाही. दुसरा सेट सिंधूने 21-6 असा सहज जिंकला. मालिकेच्या पुरूष एकेरी, पुरूष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा इतर  चारही सामन्यात भारताला हार पत्कारावी लागली. स्पर्धेतील भारताची पुढील मालिका गतविजेत्या इंडोनेशियाशी बुधवारी होणार आहे.