महापालिकेच्या उपायुक्ताच्या भावाची नगरसेवकाला धमकी
औरंगाबाद, दि. 22 - शिवसेनेचे माजी सभागृहनेता तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना महापालिकेचे उपायुक्त रविंद्र निकम यांचे भाऊ मंगेश निकम यांनी रविवारी ‘मारण्याची धमकी असून. यापुढे माझ्या भावाला त्रास दिल्यास ‘ठोकून’काढल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी फोनवर सांगितले असून या फोनची ऑडीओक्लिपही व्हॉटसअपवर फिरत असून जंजाळ यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे या घटनेमुळे शहरात खळबख उडाली आहे.
शनिवारी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या कामकाजावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या विभागाचे प्रमुख उपायुक्त रविंद्र निकम यांना या कामावरून हटवावे अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. त्यामुळे निकम यांच्याकडील अतिक्रमण हटाव विभागचा पदभार काढून घेण्यात आला होता. काल रविवारी जंजाळ आपल्या कार्यालयात बसलेले असताना त्यांच्या मोबाईलवर उपायुक्त निकम यांचा भाऊ मंगेश निकम याने फोनवर माझ्या भावाला अजिबात त्रास द्यायचा नाही, नाही तर मी ‘ठोकून’देईन असा इशारा दिला. सदर घटनेमुळे खळबख उडाली आहे.