Breaking News

बेरोजगार युवकांनी मागितली अवैध धंदे करण्याची परवानगी

नांदेड, दि. 22 - नांदेड, वाई ता.माहूर येथील बेरोजगार युवकांनी अवैध्य धंदे करण्याची परवानगी मागणारा अर्ज या युवकांनी केला आहे. 
वाई (बा) ता.माहूर हे गाव पोलीस ठाणे सिंदखेडच्या हद्दीत वसलेले आहे.या गावातील बेरोजगार युवक बाबाराव परशुराम कंधारे (35)यांनी काल दिनांक 20 मे  2017 रोजी सिंदखेडच्या सहायक पोलीस निरीक्षकांना दिलेल्या एका निवेदनात अनेक बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरु असलेल्या दारू,मटका,जुगार  अश्या आयुष्य उध्वस्त करणार्या व्यसनात गुंतत चालले आहेत. या बाबत आम्ही वारंवार पोलीस दप्तरी अर्ज करून सुद्धा प्रशासनाला ते अवैध्य धंदे बंद करायचे असे  दिसत नाही.कोणतीही ठोस कार्यवाही या धंद्यांवर जानेवारी 2017 पासून अद्याप झालेली नाही..तेव्हा आम्हा सर्व बेरोजगार युवकांना दारू, मटका, जुगार, गुटखा  आणि इतर अवैद्य धंदे करण्याची कायदेशीर परवानगी दिली तर आम्ही सर्व युवक चौका चौकात थाटाने अवैद्य धंद्यांची दुकाने थाटून इतर बेरोजगार युवकांना कमावते  बनण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देऊ. आता अवैध्य धंद्यांची चलती पाहता आम्हा बेरोजगार युवकांना इतर व्यवसाय करण्याची इच्छाच होत नाही असे निवेदनात  लिहिलेले आहे. तेव्हा आम्हा सर्व बेरोजगार युवकांना असे धंदे करण्यासाठी कायदेशीर पाठबळ द्यावे असे या निवेदनात नमूद आहे. या निवेदनाच्या प्रति  मुख्यमंत्री,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड,पोलीस अधीक्षक नांदेड,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,उप विभागीय  अधिकारी किनवट, तहसीलदार माहूर यांना देण्यात आल्या आहेत.