उत्तर प्रदेशमध्ये लोकमान्य टिळक सुपरफास्टचे 11 डबे घसरले
उन्नाव, दि. 22 - उत्तर प्रदेशमधील उन्नाव स्थानकात लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती मिळाली आहे.
मुंबईहून लखनौला जाणारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे दुपारी सुमारे पावणे दोनच्या सुमारास उन्नाव रेल्वे स्थानकात पोहोचताना रूळावरून घसरले. गाडीचा वेग कमी असल्याने यात कोणती जखमी झाले नाही. या पार्श्वभूमीवर 0522 -263 5639 आणि 0522- 2233 042 हे मदत क्रमांक देण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी लखनऊहून उन्नावला रेल्वे पाठवण्यात आली आहे. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.