Breaking News

स्वच्छ दिल्लीसाठी नागरिकांचे कौतुकास्पद प्रयत्न

नवी दिल्ली, दि. 22 - दिल्लीतील वाढते अस्वच्छतेचे प्रमाण पाहता काही नागरिकांकडून हे चित्र बदलवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘नवी दिल्ली  रायझिंग’, ‘गुडगाव रायझिंग’ अशी नावे असलेल्या छोट्या संघटना दिल्लीत नागरिकांकडून तयार करण्यात आल्या आहेत. या संघटनांच्या माध्यमातून हे नागरिक  सुट्टीच्या दिवशी स्वच्छता व व रंगकामासाठी आवश्यक सामग्री घेऊन घराबाहेर पडून वेगवेगळी ठिकाणे वाटून घेऊन स्वच्छता केली जाते. या मोहिमेबाबत बोलताना  दिल्लीतील ‘व्हि मिन टू क्लिन’ या संघटनेच्या संस्थापक सदस्य स्वाती भल्ला म्हणाल्या की, प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण  रस्त्यावर उतरून स्वत: स्वच्छतेसाठी प्रयत्न करायला हवे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही नोएडाच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करत असून येथील प्रशासनाकडूनही  आम्हाला मदत मिळत आहे. ते त्यांचे चार प्रतिनिधी आमच्या मदतीसाठी पाठवतात. नागरिक व प्रशासनाचा हा एकत्रित प्रयत्न म्हणजे शहरात स्वच्छतेसाठीचा उत्तम  मार्ग आहे, असे ते म्हणाले.
स्थानिक प्रशासनावर टीका करण्यापेक्षा त्यांना मदत करणे महत्त्वाचे असल्याचे आमचे मत आहे. नागरिकांमुळे शहर सुरू आहे, त्यामुळे नागरिकच शहराला घडवू वा  बिघडवू शकतात, असे आम्हाला वाटते असे अशाच एका संघटनेचे सदस्य नकूल म्हणाले. दिल्लीतील या वाढत्या संघटनांमुळे दिल्ली प्रशासनाच्या स्वच्छतेच्या कामात  हातभार लागत असून अन्य नागरिकांनाही यातून प्रेरणा मिळत आहे.