सप्तरंग सांस्कृतीक व संगीत महोत्सवात लावणी रंगली
नांदेड, दि. 22 - सप्तरंग सेवाभावी संस्था, अरिहंत चॅरीटेबल ट्रस्ट, नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका व निफा(नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट ऍड ऍक्टीविस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत सप्तरंग सांस्कृतीक व संगीत महोत्सवात शास्त्रीय नृत्य, उपशास्त्रीय नृत्य व मराठमोळी लावणी रंगली यावेळी गुरूव्दारा तख्त संचखंडचे डी. पी. सिंग, नरेन्द्र पारमाणी, गोपाल वर्मा, हरीश लालवाणी, पाटणी, डॉ. राजेश माने यांची उपस्थिती होती.
भारताचे विविध शास्त्रीय नृत्य संप्तरंग राष्ट्रीय महोत्सवाच्या दुस-या सत्रात भारताच्या विविध शास्त्रीय नृत्याचे कलाकार कोलकत्ता , केरळ, मुबंई, बेंगलोर, ओरीसा, पुणे, सुरत आदी राज्यातुन कलावंताने हजेरी लावली दिवसभर चाललेल्या स्पर्धेत विविध शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याचे प्रकार पे्रक्षकाना पाहायला मिळाले. कुचीपुुडी, भरतनाटयम, ओडीसी नृत्य, मोहिनी अट्टम, कथक, असे शास्त्रीय नृत्याचे प्रकार मंचावर सादर झाले. या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यातुन आलेल्या तिनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत मुबंई व कोलकत्ता येथील स्पर्धकांनी सर्वाधीक बक्षीसांची लयलुट केली आणि आपल्या कलेचा ठसा उमटविला. सांयकाळच्या सत्रात नितीन अय्यर, क्षितीजा कसरवल्ली चेन्नई, चेतन सरय्या, जुगनु कपाडीया सुरत, गौरी शंकर त्रीपाठी ओडीसा, पंडीत पवित्र भट्ट मुंबई आदी कलाकाराच्या शास्त्रीय नृत्यकलेला प्रेक्षकांनी टाळंयानी दाद दिली तर हरीयाणाच्या निफा व नांदेडच्या लय स्कुलच्या नृत्याला प्रेक्षकाने डोक्यावर घेतले.