Breaking News

दिल्ली विद्यापीठात ‘इसिस’ला पाठिंबा देणारे फलक ?

नवी दिल्ली, दि. 29 - दिल्ली विद्यापीठाच्या भिंतींवर इसिस या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणारे फलक लावण्यात आले आहेत. या प्रकरणी अखिल अखिल  भारती विद्यार्थी परिषदेचे सचिव अंकित सिंह सांगवान यांनी पोलीस ठाण्यात तक्रार असून प्राथमिक माहिती अहवाल दाखल केल्याचे पोलीस उपायुक्त जतिन नरवाल  यांनी सांगितले. 
विद्यापीठाच्या आवारातील भिंतींवर काही फलक लावण्यात आले होते. इसिसला पाठिंबा देणारे हे फलक होते असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. वाणिज्य शाखेच्या  इमारतींवर काही घोषणा लिहिण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी सांगितले. यानंतर काही काळातच  आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यावर तेथे ‘मी इसिसचा समर्थक’ असे फलकावर लिहील्याचे आढळून आले अशी माहिती अंकित याने दिली.