Breaking News

काश्मीर प्रश्‍नी मोदी सरकार कायमस्वरूपी उपाय शोधेल - राजनाथ सिंग

नवी दिल्ली, दि. 29 - काश्मीरचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मोदी सरकार कायमस्वरूपी उपाय शोधेल, असे प्रतिपादन राजनाथ सिंग यांनी केले आहे. मात्र सरकार यावर  उपाय शोधताना काश्मीरमधील जनतेचा आणि काश्मिरीयतचा विचार करेल. काश्मीर प्रश्‍नी केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचे विचार वेगळे नाहीत, असे  त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, काश्मीरच्या समेस्येचे निराकरण असे सहजासहजी करता येणार नाही. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी थोडा अवधी जाईल. असे असले तरी सरकार यावर  नक्की उपाय शोधेल. आम्ही काश्मीरला असे संकटात सोडू शकत नाही. यासाठी आम्ही कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र ही चर्चा कोणत्याही अटीशिवाय  केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.