Breaking News

सावरकरांमुळे पावन झालेल्या अंदमानास भेट द्या - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ‘मन की बात’च्या 32 व्या भागात जनतेला संबोधित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी  देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. 
आज स्वातंत्रवीर सावरकरांची जयंती आहे . या महापुरुषाने तुरुंगात लिहिलेल्या साहित्याने स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले. सावरकरांना ज्या ठिकाणी काळ्या पाण्याची  शिक्षा देण्यात आली त्या अंदमान बेटावर जावून एकदा त्या वास्तूस देशवासीयांनी भेट द्यावी असेही ते म्हणाले.
तरुणांनी सुटीच्या कालावधीत नेहमीपेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे, माझ्या प्रत्येक आवाहनाला देशवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून पर्यावरणासोबत  संवाद म्हणजे स्वत:शी संवाद , यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड आणि वृक्षारोपणासाठी योगदान द्या, असे अवाहन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यांनी  मुंबईतील वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करणार्‍या अफरोज शाह यांचे कौतूक केले.
स्वच्छता अभियान आता जनआंदोलनाचे रुप धारण करत असून आता शहरांमध्येही स्वच्छतेसाठी स्पर्धा सुरु झाल्याचे मोदी यांनी आवर्जून नमूद केले. तसेच ओला  आणि सुका कचरा वेगळा ठेवा असेही त्यांनी सांगितले. किनार्‍यावरील प्लास्टिकचा कचरा गोळ्या केल्यामुळे किनारा प्लास्टिकमुक्त झाला आहे.
भारतामध्येअसून येथे प्र, जात, परंपरा आणि विच विभिन्न असली तरी यातून फक्त शांती, एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला जातो.